वडगाव निंबाळकर आणि मुढाळे येथील रुग्णांसह बारामती तालुक्यात दिवसभरात २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कालचा उर्वरित ६७ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून वडगाव निंबाळकर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण तसेच मुढाळे येथील एक रुग्ण व शहरातील गुणवडी चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, तसेच बारामती शहरातील दोन रुग्ण असे एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व आजची दिवसभराची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २६ झाली असून एकूण बारामतीतील रुग्णसंख्या ४११ झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS