कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करा : खासदार सुप्रिया सुळे
भोर : प्रतिनिधी माणिक पवार
करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा नियमाचे पालन करण्याची आवशक्यता असल्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यावेळी तालुक्यातील कोरोना योध्याचे सन्मान करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव व उपाययोजना याची माहिती घेण्यासाठी नसरापूर ( ता. भोर ) येथे आज शुक्रवार दि. २८ रोजी प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार सुळे यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भोरचे तहसीलदार अजित पाटील, वेल्हा तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैदकीय अधिकारी सुर्यकांत कऱ्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, रेवणनाथ दारवटकर, विक्रम खुटवड, वंदना धुमाळ, संतोष रेणुसे, राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, भोरचे पोलीस निरीक्षक राजू मोरे, वेल्हा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, मंडलाधिकारी श्रीनिवास कंद्देपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, गोरव बागमार, सागर राशिनकर, गणेश पालकर आदी उपस्थित होते.
भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, ध्रुव प्रतिष्ठानचे राजीव केळकर, नसरापूर येथील नटराज युवक मंडळ व प्राथमिक शिक्षक रजनीकांत मेंढे यांना कोरोना योद्धा म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आढावा बैठकीत पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी वेल्ह्याकडे जाणाऱ्या दयनीय झालेल्या रस्त्याचे काम करण्याची विनंती केली. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी बाजारपेठ सायंकाळी सहा पर्यत खुली ठेवण्याची मागणी केली. माजी उपसभापती विक्रम खुटवड यांनी सर्व खासगी रुग्णालयाकडून लाखोच्या घरात अनामत रक्कम घेतल्याशिवाय बाधित रुग्णाला उपचारासाठी घेतले जात नसल्याचे निदर्शनात आणून दिले. तसेच वेल्ह्यातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे सुनील राजीवडे यांनी तक्रार केली. भोर शहरात वेळेवर फवारणी होत नसल्याचे माजी सभापती वंदना धुमाळ यांनी निदर्शनात आणून दिले. आदी समस्या बाबत सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली.
COMMENTS