सुप्यात ग्रामपंचायतीकडुन विविध साहित्यांचे वाटप
सुपे : प्रतिनिधी दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील पाच आंगणवाड्या तसेच दोन जिल्हा परिषद शाळांना वॉटर फिल्टर, संगणक टेबल, खुर्च्या, लाईट व्यवस्था, संगणक संच, तबला, हार्मोनियम पेटी, आहुजा कंपनीचा स्पीकर संच आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
येथील सरपंच स्वाती हिरवे व उपसरपंच ज्योती जाधव यांच्या हस्ते पाच आंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि २ येथील शाळांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
येथील ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आरोग्यशिक्षण व उपजिविकामधुन मिळणाऱ्या २५ टक्के निधीतुन जानेवारीमध्येच साहित्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या साहित्यांचे वाटप ऑगस्टमध्ये करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली.
याप्रसंगी येथील ग्रामपंचायत सदस्य मल्हारी खैरे, शौकत कोतवाल, मुनीर डफेदार, भाग्यश्री बसाळे, राजश्री धुमाळ, पल्लवी लोणकर, सुधीर बारवकर, रेखा चांदगुडे, मिनाक्षी बारवकर, सुमन जगताप, गणेश जाधव, अशोक सकट आदींसह माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल हिरवे, मुख्याध्यापक ए. जी. सकट, एस. एच. भापकर, प्राथमिक शाळांचे शिक्षक, आंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
COMMENTS