'वाणेवाडी'तील 'त्या' रुग्णाच्या संपर्कातील पत्नी आणि मुलासह सर्वांचे अहवाल निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
दि २३ रोजी वाणेवाडी येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर त्याच्या संपर्कातील ७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती यामध्ये काल पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते तर आज त्या रुग्णाची पत्नी व मुलगा या दोघांचे अहवाल देखील निगेटीव्ह आले आहेत.
काल बारामती मध्ये एकूण १०५ जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच काल रात्री ग्रामीण रुग्णालय येथे रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या २८ झाली आहे
COMMENTS