केंजळच्या विकासामध्ये चंद्रकात बाठे यांचे महत्वपूर्ण योगदान : निर्मला पानसरे
भोर : प्रतिनिधी
गावातील सर्व घटकांना उपयुक्त अशी अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण विकासकामे केल्याने शहराप्रमाणे गावचा कायापालट झाल्याने जिल्ह्यात विकासाचे मॉडेल म्हणून केंजळ गावचा उल्लेख होत आहे. कोणतेही पद नसतानाही गावाला विकासाच्या दिशेने नेण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे गौरवद्गार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी काढले.
केंजळ ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय कबड्डीपटू कै. नथुराम फाळके ओपन जिम व जॉगिग ट्रक, शाहू फुले आंबेडकर ग्राम अभ्यासिका, कै. आंनदराव बाठे शाळा लोकार्पण, अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार पेव्हींग ब्लॉक, शेत रस्ते, व पाणी पुरवठा सोलर सिस्टीम आदी विकासकामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जि.प.सदस्य वीरधवल जगदाळे, माजी आदर्श जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, माजी सभापती सुनिता बाठे, उपसभापती दमयंती जाधव, प्रकाश तनपुरे, सरपंच माया नेवसे, उपसरपंच महेश बाठे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
तेरा वर्षाच्या काळात चंद्रकांत बाठे यांनी केंजळ गावात विकास कामाची वैभव निर्मिती केली असून आगामी काळात केंजळ गावाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे दिली. तर वीरधवल जगदाळे यांनी दिली तर विकास काम करत असताना बाठे यांनी मोठा संयम बाळगून गावचा कायापालट केला आहे. आपण सुद्धा अशी निर्मिती का करू शकत नाही याचा हेवा वाटत असल्याचे सांगितले. यावेळी सौर प्रकल्प, आदर्शवत शाळेची इमारतसह अत्याधुनिक केलेल्या विकासकामाची पाहणी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत बाठे आभार प्रकाश तनपुरे यांनी केले.
COMMENTS