शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला सभासदांच्या विविध मागण्यांविषयी शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आज सकाळी साडेअकरा वाजता हे निवेदन देण्यात आले. कारखान्यात संचालक मंडळ अथवा कार्यकारी संचालक उपस्थित नसल्याने कृती समितीने आवक जावक विभागाचे दिलीप पवार यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, सोमेश्वर कृती समितीचे अध्यक्ष शहाजी जगताप, सोमेश्वर चे संचालक पी,के, जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पासाहेब गायकवाड, स्वाभिमानीचे बारामती तालुकाध्यक्ष कल्याण भगत, निरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, प्राध्यापक बाळासाहेब जगताप, शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदन काकडे, पोपटराव थोपटे, बाबासाहेब शिंदे, सुरेश शेंडकर, अमरसिंह चव्हाण, जालिंदर जगताप, राहुल जगताप, अविनाश जगताप आदी उपस्थित होते
COMMENTS