'वाणेवाडी'तील 'त्या' रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील काल दि २३ एका जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील पाच जणांची आज कोरोना चाचणी करण्यात आली ती निगेटीव्ह आली आहे.
चार दिवसापूर्वी करंजेपुल येथील दोन रुग्ण आणि काल वाणेवाडी येथील एक रुग्ण असे एकूण तीन रुग्ण या भागात सापडले आहेत. करंजेपुल रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असून आज वाणेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
काल बारामती मध्ये एकूण एकशे दोन नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल निगेटिव आला असून बारामती शहरातील २ व ग्रामीण भागातील मूर्टी येथील एक असे तीन रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे व इतर तालुक्यातील दोन रुग्णांचे अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेले आहेत तसेच आज ग्रामीण रुग्णालय रुई येथे शासकीय एंटीजेन टेस्ट सुरू केली असून आज संध्याकाळपर्यंत ३८ जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी बारामती शहरातील तीन व ग्रामीण भागातील माळेगाव व मूर्टी येथील प्रत्येकी एक असे पाच रुग्णांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत तसेच आज दिवसभरात बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण २० जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील तीन असे सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात एकूण पंधरा रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे बारामती लोकसंख्या रुग्णसंख्या ५५६ झाली आहे तसेच बारामतीतील भोई गल्ली येथील एका सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यूंची संख्या २७ झालेली आहे तसेच आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३१० झालेली असून सध्या उपचाराखालील रुग्ण दोनशे एकोणीस आहेत
COMMENTS