बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी..१३६ पैकी १३३ अहवाल निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिनांक ११/०८/२० रोजी घेतलेल्या उर्वरित ४९ प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व अहवाल निगेटिव आहेत त्यामुळे ११/०८/२० रोजी घेतलेल्या एकूण १३६ नमुन्यांपैकी काल बारामती शहरात आढळून आलेले तीन रुग्ण वगळता उर्वरित १३३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
तसेच काल एकूण तपासणीसाठी ७४ नमुने घेण्यात आले आले होते त्यापैकी ३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चाळीस जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरातील म्हाडा कॉलनी येथील एक महिला व पणदरे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक पुरुष असे दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या २९८ झालेली आहे
COMMENTS