बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक
बारामती प्रतिनिधी
बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट तपास केल्याबद्दल उत्कृष्ट तपासाचे पदक जाहीर झाले आहे.
त्यांना हे पदक गंगाखेड येथील कामगिरीबद्दल जाहीर झाले
आहे.सन २०१६ च्या कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नारायण शिरगावकर गंगाखेड येथे कार्यरत होते. त्यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेटमध्ये कार्यरत असताना एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला होता. या घटनेने तेथील वातावरण ढवळून होते. मात्र शिरगावकर यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता व कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना या घटनेचा
तपास केला. या घटनेतील आरोपीला अटक करून त्या घटनेशी संबंधित पुरावे गोळा केले. या घटनेचा तपास त्यांनी काटेकोर पध्दतीने केला. अखेर या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली. नुकतीच गृहमंत्रालयाकडून राज्यातील उत्कृष्ट तपासी अधिकाऱ्यांमधून १० जणांची निवड करण्यात आली, यामध्ये शिरगावकर यांचीही निवड करण्यात आली. बारामतीतही श्री.शिरगावकर यांनी दणकेबाज कामगिरी करत कायदा सुव्यवस्था राखण्यात भरीव योगदान दिले आहे. त्यांना मिळालेल्या या पदकाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS