मुर्टी आणि निंबुत येथील कंपनीतील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह : तालुक्याची रुग्णसंख्या २९६ वर

Admin
मुर्टी आणि निंबुत येथील कंपनीतील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह : तालुक्याची  रुग्णसंख्या २९६ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या ७७ नमुन्यांपैकी पंचवीस जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून शहरातील तीन जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व उर्वरित 49 अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये तांदुळवाडी तील एक रुग्ण ,रुई पाटी येथील एक रुग्ण व अशोक नगर मधील एका रुग्णाचा समावेश आहे तसेच मूर्टी येथील एक रुग्ण व निंबुत येथील कंपनीतील एक रुग्ण यांचा खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या २९६ झालेले आहे. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top