बारामतीत खाजगी प्रयोगशाळेतील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत खाजगी प्रयोगशाळेतील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरामध्ये बारामती येथील खाजगी प्रयोग शाळेमध्ये एकूण ३२ जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती त्यापैकी बारामती शहरातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण भागातील दोन जणांचा त्यामध्ये माळेगाव शिवनगर येथील एका पुरुषाचा व मेडद येथील एका ज्येष्ठ महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या ३२६ झालेले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देसाई इस्टेट येथील  पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्णांचा तसेच निर्मिती हिल्स कसबा बारामती येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्णांचा ॲक्सिस बँकेच्या पाठीमागे एमआयडीसी बारामती येथील एकाच कुटुंबातील दोन रुग्णांचा व हरिकृपा नगर येथील एका महिलेचा समावेश आहे
To Top