दरोडयातील रोख रक्कम ४३ लाख व पावणे चार
कोटीची सिगारेट व कंटेनर फिर्यादीला परत : वडगाव निंबाळकर पोलोसांची कारवाई
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दि २४/६/२०२० रोजी ITC सिगारेट कंपनी रांजणगाव येथुन आयशर ट्रक न NL 01 L 4339 या ट्रकमध्ये ITC कंपनीमध्ये तयार झालेली फिल्टर
सिगारेट बॉक्स असा किमंत ४,६१८८८२०.६७ (चार कोटी एकसष्ट लाख, अठठयाऐंशी हजार आठशे वीस) रू चा माल भरून तो राजणगाव एम.आय.डी.सी. ते हुबळी राज्य कर्नाटक या ठिकाणी
घेवुन जाणेसाठी राजणगाव एम.आय.डी.सी -न्हावरा
मार्गे हुबळीकडे जात असताना दुपारी २.०० वा सुमा मोरगाव ता बारामती गावचे हददीत १३
अनोळखी इसमाने सिगारेट सह ट्रक लुटला होता. सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर ३१४/२०२० भादवि ३९५,३९७,३४१, शस्त्र अधिनियम ४,२५ प्रमाणे दाखल असुन त्याप्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील एकुण ७ आरोपींना दि.२६/६/२०२० रोजी अटक केली होती सदर गुन्हातील ३,८९३४७९२( तीन कोटी एकोनन्द लाख, चौतीस हजार सातशे ब्यान्नव) चा आय.टी.सी कंपनी सिगारेटचा बॉक्स व ट्रक जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील सिगारेट व ट्रक हा न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीचे ताब्यात दिला आहे. वरिल दोन्हीही गुन्हयाचा तपास
पोलीस अधिक्षक संदिप पाटील अपर अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.
पोलीस निरीक्षक एस.व्ही.लांडे यांनी केला व मुददेमाल कारकुन म्हणुन सहा फौज एस बी वेताळ
यांनी कामकाज पाहिले
COMMENTS