आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २२१ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कालचे प्रतिक्षेत असलेले सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती तालुक्यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव आलेले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील ५ (भोई गल्ली बारामती येथील २६ वर्षाचा व २८ वर्षाचा युवक असे दोन व रुई येथील २२ वर्षाची महिला ,जळोची येथील ४५ वर्षीय महिला व जामदार रोड येथील तीस वर्षाचा पुरुष) असे शहरातील पाच व बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील ५६ वर्षाचा पुरुष, शिरसुफळ येथील ७२ वर्षाचा पुरुष व बराणपुर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण असे एकूण नऊ रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २२१ झालेली आहे. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS