आज बारामती तालुक्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल एकूण ८२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ६० जणांचा अहवाल प्राप्त झाला असून २२ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालात पैकी बारामती शहरातील ८ व ग्रामीण भागातील ४ असे १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व बारामतीची एकूण रुग्ण संख्या 267 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
तसेच काल रात्री तसेच पणदरे येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या १८ झालेली आहे बारा बारामतीतील ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शिरसुफळ येथील २ व वंजारवाडी येथील एक आणि धुमाळवाडी येथील एक रुग्णाचा समावेश आहे
शहरांमध्ये वसंत नगर मध्ये एक, अमराई मध्ये एक ,जगताप मळा येथे एक, बस स्टँड शेजारी दोन, तांदुळवाडी येथे एक,आयएसएमटी कॉलनीमध्ये एक, भोई गल्ली येथे एक असे रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत
COMMENTS