यूपीएससीत यश मिळवणाऱ्या ऋषिकेश कोंडे यांचे शिवसेनेच्या वतीने सत्कार
भोर : प्रतिनिधी
सामाजिक कामाचा वसा घेतलेल्या रचना संस्थेचे संचालक श्रीपाद कोंडे यांचे चिरंजीव, साळवडे गावचे सुपुत्र ऋषिकेश कोंडे यांनी यूपीएससी परीक्षेत देशात ६८८ क्रमांक मिळवत यश संपादन केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी ऋषिकेश कोंडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
शिवगंगा खोऱ्यातील रत्न ऋषिकेश कोंडे यांनी यूपीएससी परीक्षेत हे उत्तीर्ण झाल्याने संपूर्ण तालुक्याचे मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी घेतलेली मेहनत व परिस्थितीवर केलेली मात खरोखर प्रेरणादायी असल्याचे रमेश कोंडे यावेळी गौरवदगार काढले आहे. शिवसेनेच्या वतीने साळवडे येथे ऋषिकेश कोंडे यांच्या घरी जाऊन त्यांचा आणि परीवाराचा सोशल डीस्टन्स ठेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कोंडे, महेश कोंडे, भोर, वेल्हा मुळशी सामाजिक संस्थेचे दीपक तांबट उपस्थित होते. तर शिवसेनेचे सहसपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे आदींनी ऋषिकेश यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यातून ९० तर, देशभरातील जवळपास ८५० विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून यापैकी साळवडे ( ता. भोर ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश कोंडे यांनी ६८८ क्रमांक मिळवत यश संपादन झाल्याने गावासह परिसराचे नाव उंचावले आहे. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले असून त्यांना मार्गी संस्थेचे प्रविण चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. ऋषिकेश यांच्या या यशाने निश्चितच साळवडे गावाची पताका देशात फडकली असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
COMMENTS