तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार
सोमेश्वर रिपोर्टर न्युज
राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असुन गुंड प्रवृत्ती आणि त्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.
सुचित्रा आमले खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत.जमिनीच्या नोंदी, दाखले,रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत.तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली. मात्र हे केल्यावर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली.त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरत असल्याचे सांगितले जाते. म्हणून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले. तक्रारीत तहसीलदार सौ आमले यांच्या पाठींब्याने ही कामे होत आहेत...

COMMENTS