जावयानेच काढला सासऱ्याचा काटा : पुरंदरच्या नाझरे सुपे येथील घटना
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीकच्या नाझरे सुपे येथील एका विवाहित मुलीच्या वडिलांचा जावयाने खून केल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील विवाहिता नाझरे सुपे येथील आपल्या माहेरी आठ दिवसांपूर्वी आली होती. तिला आणण्यासाठी काल ८ ऑगस्ट रोजी तिचा पती आला असता सासरे जावायामध्ये वाद झाला व जावयाने सासऱ्याचा खून केला.
जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेशनच्या हद्दीतील नाझरे सुपे गावातील किसन देशा काळे यांची विवाहीत मुलगी सुरेखा सुरेश भोसले राहणार मिरवडी (ता.दौंड) हिचे तिचा नवरा सुरेश सदाशिव भोसले हा छळ करीत असल्याने ती आठ दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. दरम्यान काल ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुलीचे वडील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पत्नी मुलगी व दोन मुलांसोबत काम करत असताना जावई सुरेश भोसले शेतामध्ये आला व माझी बायको का पाठवत नाही, असे म्हणून किसन काळे यांचे बरोबर भांडू लागले वाद-विवादात बाचाबाची सुरू असताना जावई सुरेश भोसले याने खिश्यातून चाकू काढत सासरे काळे यांच्या पोटात खूपसला त्यामुळे काळे गंभीर जखमी झाले. काळे यांच्या दोन्ही मुलांनी काळे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान काळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा नितीन किसन काळे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सुरेश सदाशिव भोसले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश भोसले हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.
COMMENTS