बारामतीत आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
101 नमुन्यांपैकी 80 जण निगेटिव आले असून 9 प्रलंबित नमुन्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बारामती शहरातील 68 वर्षीय महिला, गुणवडी तील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील वीस वर्षीय युवती, बारामती शहरातील 43 वर्षीय महिला , मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे. तर सकाळी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली आहे अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS