निरा येथे एकाचा अहवाल पॉझिटिव्ह : पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५० तर मृत्यू २६
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवडसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज रविवार आलेल्या खाजगी व शासकीय अहवालानुसार सह व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल शनिवारी दुपारी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२९ झाली आहे तर मृत्यु २६ झाली आहे.
काल शनिवारी दि.८ रोजी दुपारी साडेतीनला आलेल्या अहवालानुसार सासवड येथील परंतु पुण्यात दवाखान्यात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आज रविवार दि.९ रोजी पुरंदर तालुक्यातील दोन सासवड, एक भिवडी, एक नीरा असे चार व्यक्तीचे खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. सासवड येथुन पाठविण्यात आलेल्या २९ व जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ३२ स्वॅप पैकी एक सासवड व एक कदमवस्ती येथील असे दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS