लोणंद पोलिसांना खजूर चे वाटप : सामजिक संस्थांचा उपक्रम

Admin
लोणंद पोलिसांना खजूर चे वाटप : सामजिक संस्थांचा उपक्रम

लोणंद : प्रतिनिधी

 इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स व इनरव्हील क्लब लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने  लोणंद पोलिस स्टेशन सपोनि संतोष चौधरी व त्यांचे सर्व सहकारी यांना खजूर वाटप केले. 
              अंबरनाथ हिल्सच्या स्वाती जगताप यांनी लोणंद पोलीस स्टेशन व इनरव्हील क्लब लोणंद यांचे आभार मानले. इनरव्हील लोणंद अध्यक्ष डॉ स्वाती शहा यांनी चौधरी साहेब व त्यांच्या सर्व सहकारी यांचे लोणंद मधे या कोरोना काळात जीव तोडून काम करत असल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सेक्रेटरी शिल्पा शहा व  क्षमा शहा यांनी स्वाती जगताप यांचा सत्कार केला. या वेळी लोणंद पोलीस स्टेशन चे चौधरी साहेब व त्यांचे सर्व सहकारी, इनरव्हील च्या शानू चंद, दर्शना रावळ व बिल्कीस शेख उपस्थित होत्या. 
To Top