बारामतीत आज दिवसभरात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज उर्वरित २२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामतीमधील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
शासकीय अहवालात नमूद केलेल्या पत्त्यानुसार जीवराज नगर येथील ४३ वर्षीय पुरुष भोई गल्ली येथील वीस वर्षीय युवक आमराई येथील २४ वर्षीय महिला जगताप मळा येथील ४५ वर्षीय महिला भोई गल्ली येथील ७० वर्षीय पुरुष इंदापूर रस्त्यावरील ५४ वर्षीय पुरुष, कसबा येथील ५० वर्षीय महिला, बारामती ॲग्रो येथील ४९ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष व मलगुंडे वस्ती येथील २१ वर्षीय युवतीचा यामध्ये समावेश आहे.