पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार जणांसह तालुक्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार जणांसह तालुक्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल बारामती मध्ये ९३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये ७० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
         त्यामध्ये बारामती शहरातील भोई गल्ली येथील २ म्हाडा कॉलनीतील एक ख्रिश्चन कॉलनीतील एक एमआयडीसी बारामती येथील १ रुग्ण असे पाच व पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार रुग्ण मळद येथील एक रुग्ण झारगडवाडी वाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण व खांडज मधील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे
To Top