सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कथा पाच मित्रांच्या जिद्दीची : वाणेवाडी गावात उभारलेल्या एकता कुस्ती तालीमची

कथा पाच मित्रांच्या जिद्दीची : वाणेवाडी गावात उभारलेल्या एकता कुस्ती तालीमची 

सोमेश्वरनगर : विशेष प्रतिनिधी
शशिकांत जेधे- देशमुख

बारामती तालुक्यातील वानेवाडी गावातील पाच मित्र एकत्र येतात, मनात एकच जिद्द गावात सुंदर तालीम उभी करायची, त्यातून सुरू होतो तालमी उभी करण्यासाठी संघर्ष... आज त्या मित्रांचा संघर्ष संपला आहे. आज त्यांचं स्वप्न साकार झालं आहे. तालीम पूर्णत्वास आली आहे. 
         ४ ऑगस्ट २०२० ला १६०० चौ फूट च्या कुस्ती तालीम चा गृहप्रवेश झाला.  एकही रुपया सरकारी अनुदानाचा न घेता ही सुमारे दहा लाखाची इमारत उभी राहिली ती केवळ प्रशांत भोसले , मनोज सावंत , चेतन यादव , प्रशांत गायकवाड व संग्राम डोंबाळे या पाच तरुणांच्या जिद्दीने व वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या दातृत्वाने.  तीन वर्षांपूर्वी पाया पूजन केले त्यावेळी पन्नास हजार सुध्दा गोळा झाले नव्हते . शिवछत्रपती स्पोर्ट्स क्लब ने जागा उपलब्ध करून दिली व या छोट्या रकमेवर काम सुरू झाले. एका बाजूला शाळेच्या एका छोट्या खोलीत ग्रामपंचायतीने मॅट देऊन त्यावर कोचिंग चालू केले . त्याच वेळेस मोठे बांधकाम हाती घेतले . कोणी देवो अथवा न देवो मदत मागत राहिले . छोटी छोटी मदत काम पुढे चालू ठेवण्यास मदत करत होती . मनोज पोलीस , ड्युटी बजावून परत कोचिंग व मदतीसाठी फिरणे असा तिहेरी सामना चालू होता . प्रशांत सुध्दा दिवसभर  शेतात , घरी मोठा गोठा , टोमॅटो चा शेतात घाट असा भरगच्च कार्यक्रम असताना सुध्दा वेळ देत होता . चेतन घरची शेतीची कामे , स्वतः ट्रॅक्टर चालवून , गुरे ढोरे बघून  ह्या कामात गुंतलेला . प्रशांत गायकवाड पत संस्थेत दिवसभर रिकरिंग  व संग्राम डोंबाळे  हे सुध्दा घरची परिस्थिती बेताची असून सुध्दा घर व कुस्ती प्रशीक्षण व कुस्ती केंद्र उभारणी ह्यासाठी झटत होते . 
पैश्यामुळे काम बंद पडले की पुन्हा नव्या जोमाने मदतीसाठी फिरणं चालू . पाया भरून स्वरुप येत आहे असे दिसताच गावातील जेष्ठ पुढाऱ्यांनी हनुमान देवस्थान ट्रस्ट मार्फत एक लाख सुरुवातीस व नंतर एक लाख पुढील वर्षी अशी मदत दोन लाख रुपये केली . मंदिर बांधणे सोडून व्यायाम मंदिरासाठी रक्कम ट्रस्ट कडून प्रथमच झाली . मग कुणी वीट , कुणी सिमेंट , कुणी डबर , अशीही मदत प्राप्त झाली . काहीवेळा यांनी उसनवारी करून बांधकाम बंद पडू नये म्हणून प्रयत्न केला . मजूर , गवंडी ,यांनी कमी दरात काम केले . पत्रा व कैची काम करताना  खुशीने  झालेल्या कामापेक्षा 15/20 हजार कमी घेतले . अशी गावातून व ओळखीच्या परिसरातील लोकांकडून मदत घेऊन दिमाखदार एकता तालीम ची इमारत पूर्ण झाली आहे . अजूनही किरकोळ काम राहिले आहे . काही रक्कम सुध्दा देणे बाकी आहे . पण आता दोन दिवसांपासून हक्काच्या इमारतीत कुस्ती चालू झाली आहे . कुस्ती खेळणाऱ्या 40/50 मुलांनी वेळोवेळी श्रमदान केले आहे . या पाच जणांचा एकच ध्यास आहे येथून राष्ट्रीय पातळीवर खेळणारा कुस्ती पटू तयार करणे . आज तेथे खेळणाऱ्या  छोट्या कुस्तीपटू च्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ....तेच या पाच मित्रांचे भांडवल आहे ....पुढचा प्रवास सुध्दा तितकाच संघर्ष पूर्ण आहे ...पण यांची एकजूट , जिद्द , व समर्पणाची वृत्ती व वाणेवाडी च्या गावकऱ्यांची चांगलं ते उचलून धरण्याची , त्यासाठी मदत करण्याची भावना पुढेही हे पाच जण एकत्र चांगला रिझल्ट देतील यात शंका नाही . 

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6983,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कथा पाच मित्रांच्या जिद्दीची : वाणेवाडी गावात उभारलेल्या एकता कुस्ती तालीमची
कथा पाच मित्रांच्या जिद्दीची : वाणेवाडी गावात उभारलेल्या एकता कुस्ती तालीमची
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqYNpeD7WLCXdRcJYen2U1gvw2Rg0PXptknhqWmuA4_MegFKyiC02ZkS1rdG09nv2n4Nue9gVBhuLM5xjoeMEILx9P6fak80waLZqgvqDsVnRDPecGwj3XQ0Qt4sBD4bK5uxkjBk2IgYHy/s1600/1596714673263295-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqYNpeD7WLCXdRcJYen2U1gvw2Rg0PXptknhqWmuA4_MegFKyiC02ZkS1rdG09nv2n4Nue9gVBhuLM5xjoeMEILx9P6fak80waLZqgvqDsVnRDPecGwj3XQ0Qt4sBD4bK5uxkjBk2IgYHy/s72-c/1596714673263295-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_96.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_96.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy