भापकरमळ्यात हरणाला जीवदान
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
चौधरवाडी ता.बारामती नजीक भापकरमळा येथील काही तरूण युवक शेतामध्ये काम करीत असता त्यांना जवळच्या माळावर एका चिंकारा जातीच्या हरणाचा काही भटकी कुत्री पाठलाग करताना पहिले त्या नंतर या तरुणांनी माळाकडे धाव घेतली व त्या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली पण तेथे पोहचेपर्यंत हरणास काही प्रमाणात जखमी केले होते .
त्यामधील एका तरुणाने तात्काळ गावचे पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांना फोन करून घडलेली हकीगत सांगितली तात्काळ पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेस्ट चे कर्मचारी नदकुमार गायकवाड यांना बोलावून घेतले .गायकवाड यांनी त्याचे सहकारी नवनाथ रासकर यांना बोलविले व वरिष्ठ अधिकारी योगेश कोकाटे यांना फोन करून माहिती दिली व तात्काळ कोकाटे घटनास्थळी आले त्यांनी लगेच वाहनांची सोय केली व ते स्वतः व सहकारी कर्मचारी यांनी त्या हरणास घेऊन पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना झाले .याकामी भापकर मळा येथील युवराज भानुदास भापकर ,विशाल भापकर ,अक्षय भापकर ,अनिल भापकर ,शुभम भापकर ,राहुल भापकर या तरुणांनी तसेच सोसायटीचे चेअरमन रोहिदास चौधरी ,विलास भापकर ,भाऊसो भापकर.संभाजी भापकर यांनी मोलाचे सहकार्य केले .
COMMENTS