नीरा येथे अँन्टिजेन स्वँब तपासणी केंद्र सुरू करण्याची नागरिकांची मागणी
नीरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसरात सद्या कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. त्यातच डेंग्यू व चिकणगुण्या सद्रुष्य संसर्गजन्य रोगाची साथ जोरदार सुरु आहे. त्यामुळे रूग्णांना तातडीने उपचार मिळावे या करिता प्रशासनाने नीरा प्रा.आरोग्य केंद्रात अँन्टिजेन स्वँब तपासणी केंद्र सुरू करावे अशी मागणी नीरेतील जाणकार नागरिक करीत आहे.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्येने मोठ्या असलेले नीरा गांव, तसेच पिंपरेखुर्द, मांडकी, जेऊर गुळूंंचे, कर्नलवाडी आदी गावात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यातच बदलत्या हवामानामुळे व डेंग्यू, मलेरिया, चिकणगुण्या या सारख्या संसर्गजन्य रोगाचाही प्रसार जोरदार होत असल्याने अशा रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित रुग्ण खाजगी दवाखान्यात गेल्यामुळे त्याला डेंग्यू, मलेरिया किंवा चिकणगुण्याची लक्षणे असली तरी कोरोनासारखी लक्षणे दिसत असल्यामुळे अशा रूग्णांची कोरोणाची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. त्यामुळे नीरा व परिसरातील रूग्णांना तपासणी करिता ३० कि.मी. लांब असलेल्या जेजुरी नजिक तक्रारवाडी येथील कोरोना केअर सेंटरला जावे लागते. सर्वसामान्य रुग्णांना तक्रारवाडी केंद्रावर जाण्यासाठी वेळ घालविणे व पैसा खर्च करणे परवडत नाही. तसेच
तक्रारवाडी येथील केंद्रावर शनिवार व रविवार या दिवशी स्वँब घेतले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत चार ते पाच दिवस निघुन जातात. या दरम्यान रूग्णांचा आजार जादा बळावतो. प्रसंगी संबंधित रूग्णाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.अशा वेळी रुग्णाला तातडीने उपचार मिळणे करीता रूग्णांना होणारा त्रास व धावपळ कमी करण्याकरिता प्रशासनाने नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँन्टिजेन स्वँब तपासणी केंद्र सुरू करावे
तसेच खाजगी हाँस्पिटलला देखील परवानगी द्यावी
अशी मागणी नागरिक करीत आहे.
दरम्यान, नीरा व परिसरातील कोरोना संशयित रूग्णांना कोव्हिड १९ ची तपासणी करण्याकरिता जेजुरीजवळील तक्रारवाडी येथील कोव्हिड सेंटरला जाणेकरिता सुमारे ३० कि.मी चे अंतर पार करावे लागते.यासाठी सर्वसामान्य रूग्णांना खाजगी वाहन उपलब्ध होत नाही . नीरा व परिसरातील रूग्णांना तातडीने उपचार मिळण्याकरिता नीरा प्रा.आरोग्य केंद्रात अँन्टिजेन स्वँब केंद्र सुरू करण्याकरिता पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी लक्ष घालण्याची मागणीही नीरेतील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
COMMENTS