वडगाव निंबाळकर पोलीसांकडून मास्कचा वापर न करणाऱ्या २७५ जणांवर कारवाई करत १,२६,७०० रुपयांचा रोख दंड वसूल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून दि २८ ते दि ३० रोजी पर्यंत ३ दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहन चालविताना मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण २७५ नागरिकांकडून १,२६,७००/- इतका रोख दंड आकारण्यात आलेला असून सोशल डिस्टन्स चे पालन न करणाऱ्या ६ नागरिकांविरुद्ध भा.द.वि १८८ प्रमाणे खटले दाखल करणेत आलेले आहेत.
सदरची कामगिरी .संदीप पाटील सो.(भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा. .मिलिंद मोहिते सो.(म.पो.से) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रा..नारायण शिरगावकर सो. (म.पो.से) उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, पुणे ग्रा.,यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी .सोमनाथ लांडे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक ) यांचे पथकाकडून करणेत आलेली आहे.
COMMENTS