पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 2 लाख 90 हजार 884 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 2 लाख 90 हजार 884 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 

            पुणे,दि.9 :-

पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   66 हजार 977 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण   2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 14  हजार  5  रुग्णांपैकी  1 लाख 59 हजार  986 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 36  हजार 805 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार   614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.29 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.43  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 19 हजार 609 रुग्णांपैकी 11 हजार 451  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7 हजार 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21  हजार 667 रुग्णांपैकी 15 हजार 591  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 226 आहे. कोरोनाबाधित एकूण 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  18  हजार 281  रुग्णांपैकी  9 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 29  हजार 922  रुग्णांपैकी 19  हजार  325 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  9 हजार  663 आहे. कोरोनाबाधित एकूण 934 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 21  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 619 सातारा जिल्ह्यात 621, सोलापूर जिल्ह्यात 403, सांगली जिल्ह्यात 573  तर कोल्हापूर जिल्ह्यात 305 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 38 हजार 800 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 90  हजार 884  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 8 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top