बारामतीचा जनता कर्फ्यु वाढणार का? आजही तब्बल ११२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दि ७ पासून बारामती शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु लावला आहे. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या थांबत नसून काल १२५ जणांना तर आज ही तब्बल ११२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कालचे एकूण rt-pcr नमुने २७९
एकूण पॉझिटिव्ह ६०
प्रतीक्षेत ८२
कालचे एकूण एंटीजन १२९
एकूण पॉझिटिव्ह ५२
काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह ११२
शहर- ६९ ग्रामीण- ४३
एकूण रूग्णसंख्या-१७६७
COMMENTS