पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 3 लाख 23 हजार 925 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter


पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 3 लाख 23 हजार 925 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


       पुणे,दि.13 :- 

पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3  लाख 23  हजार 925 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   75 हजार 903  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 344  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.58  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.30 टक्के आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 2  लाख 20  हजार 692  रुग्णांपैकी 1  लाख 74  हजार  627  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 117 आहे. कोरोनाबाधित एकूण  4 हजार 948  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण      79.13 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 22  हजार 863  रुग्णांपैकी  14 हजार 567  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 672 आहे. कोरोनाबाधित एकूण 624  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  24  हजार 178   रुग्णांपैकी  16  हजार 997  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 258 आहे. कोरोनाबाधित एकूण 923  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 22  हजार  306  रुग्णांपैकी 12  हजार  376  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 109  आहे. कोरोनाबाधित एकूण 821  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 33  हजार 886  रुग्णांपैकी 22   हजार 111  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10   हजार 747  आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8  हजार 65 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 717सातारा जिल्ह्यात 716सोलापूर जिल्ह्यात 740, सांगली जिल्ह्यात 936   तर कोल्हापूर जिल्ह्यात 956   अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 47  हजार 350 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3  लाख 23  हजार 925  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि  12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top