सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त भोर उपविभागातील वनरक्षक कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव

 राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त

        भोर उपविभागातील वनरक्षक  कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव

 

पुणे दि.13 : -   

वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वन अधिकारी / वन कर्मचारी यांच्या  स्मरणार्थ दरवषी 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा  दिन म्हणून केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. वन आणि वन्यजीवन संवर्धनाचे कर्तव्य बजावित असताना ज्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे अशा देशातील 13 वन अधिकारी / वन कर्मचारी यांना पर्यावरण , वन व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याद्वारा राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात आले.

            राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त्‍ यावर्षी 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला महानिदेशक श्री.गुप्ता यांनी हुतात्मा दिन साजरा करण्याची पार्श्वभूमी विशद केली. पर्यावरण, वने व वातावरण बदल विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी वन हुतात्म्यांनी प्राणाची बाजी लावून वनसंरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ण व्यक्त करुन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त्‍ केली.तसेच पर्यावरण, वने व वातावरण बदल विभागाचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सर्वांना संबोधित केले. सन 2019-20 मधील 13 वन हुतात्मांच्या नावांची घोषणा करण्यात येवून त्यांना डिजीटल प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय 12 वन हुतात्म्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

            महाराष्ट्रात सन 1935 पासून आजवर 28 वन कर्मचारी / वन अधिकारी यांनी वनांचे संरक्षण करताना आपले बलिदान दिले आहे. पुणे वनवृत्तातील भोर उपविभागांतर्गत कार्यरत असलेले कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे,वनरक्षक ( चांदवणे) हे दि.28 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या वनक्षेत्रातील वनवणवा नियंत्रणात आणताना गंभीररित्या भाजून जखमी झाले व दि.3 जानेवारी 2018 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वन विभागामार्फत वन हुतात्मा कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे,वनरक्षक ( चांदवणे) यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना उपविभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली असून सध्या त्या तेथे कार्यरत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त भोर उपविभागातील वनरक्षक कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव
राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त भोर उपविभागातील वनरक्षक कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव
https://lh3.googleusercontent.com/-eL4V83tdQ5o/X14eXhX_C7I/AAAAAAAAC88/TauR7I99lVwFUVvigPbPR3mlSJIpFG4twCLcBGAsYHQ/s1600/1600003671765020-0.png
https://lh3.googleusercontent.com/-eL4V83tdQ5o/X14eXhX_C7I/AAAAAAAAC88/TauR7I99lVwFUVvigPbPR3mlSJIpFG4twCLcBGAsYHQ/s72-c/1600003671765020-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_22.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_22.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy