पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 77 हजार 911 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 77 हजार 911 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव


       पुणे,दि.07 :- 

पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 77  हजार 911 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  63 हजार 209  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  7  हजार 309 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण      2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.63  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 1  लाख 93  हजार 13  रुग्णांपैकी  1 लाख 53  हजार  936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34  हजार  613 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार  464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण    79.75 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 18  हजार 490  रुग्णांपैकी 10  हजार 777  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार  225 आहे. कोरोनाबाधित एकूण 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20  हजार 704   रुग्णांपैकी  15 हजार 164  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 718  आहे. कोरोनाबाधित एकूण 822 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 17  हजार 25  रुग्णांपैकी 9  हजार 65  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 660  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 28  हजार  679 रुग्णांपैकी  18  हजार  451 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 875  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7   हजार 615 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 447सातारा जिल्ह्यात 827 सोलापूर जिल्ह्यात 534  , सांगली जिल्ह्यात 763  तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 44  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 95  हजार 493 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 77  हजार 911  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि6 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top