पत्रकारांसाठी हॉस्पिटल मध्ये राखीव बेड ची सुविधा मिळावी : तहसीलदार यांना बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सध्या सर्वञ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून पञकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत. कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशी मागणी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना बारामती तालुका ग्रामीण पञकार संघाने वतीने देण्यात आले.
यावेळी बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, सचिव चिंतामणी क्षीरसागर, सदस्य वसंत मोरे, युवराज खोमणे व संतोष भोसले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कोविड-19 ने बाधित होणार्या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवेदनाची प्रत ईमेल केली असून बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
COMMENTS