दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला...तरडोली ग्रामपंचायत चा अजब कारभार

Admin
दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पाखालीला...तरडोली ग्रामपंचायत चा अजब कारभार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

तरडोली ता. बारामती येथे आज एका रुग्णाचा रिपोर्ट  कोरणा पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील सर्वच रस्ते बंद करण्यात आले. मात्र ज्या घरात रुग्ण सापडला आहे .तेथे  कोरोना प्रतीबंध स्वरुपाचा कुठलाही फलक लावला नसल्याने  'चुड्याच सोडून  मुड्याला ' या म्हणीची प्रचीती आली आहे .
         आज येथील लॉंड्री  व्यवसाय करणाऱ्या   जेष्ठ नागरीकाचा  कोरोना रिपोर्ट  पॅझीटीव्ह आला असल्याने  प्रशासनाच्या वतीने गाव सॅनीटायझीशन केले .  यानंतर गावात  जाणारे सर्व रस्ते  तात्काळ बंद  केल्यामुळे  ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरडोली गावात येणाऱ्या  मुख्य रस्त्याबरोबरच इतर सर्व रस्ते बंद केल्यामुळे कामावरून गाडी घेऊन घरी  येणारे ,  जनावरांना चारा आणणारे  शेतकरी ,   दुध संकलनासाठी आलेले दुध व्यवसाईक व  मुख्य म्हणजे  दवाखान्यात जाणारे रुग्ण या सर्वांना   अडचणीला सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांकडून तिव्र असंतोष व्यक्त होत आहे .
        गावातील ग्रामपंचायत मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत . आज गावात जाणारे रस्ते आरोग्य खात्याच्या  एका कर्मचाऱ्यांकडुन बंद केले आहेत . याबाबत  आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे . गावातील सर्व रस्ते बंदबाबत कोरोना दक्षता समीती अनभिज्ञ होती . तसेच ज्या घरात रुग्ण सापडला आहे . तेथे कोरोना प्रतीबंध क्षेत्राबाबत एकही फलक लावला नसल्याने प्रशासनाचा या भोंगळ कारभारामुळे चुड्याच सोडून मुड्याला  ही प्रचीची जाणवत होती 
To Top