प्रतीक्षा संपली....जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना मिळाल्या ५१ नव्याकोऱ्या अँब्युलन्स
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
हेमंत गायकवाड
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी होणारी हेळसांड आता थांबली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्या को- या ५१ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज पुणे येथे राज्याचे उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमा प्रसंगी राज्य कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,आरोग्य अधिकारी भगवान पवार आदी उपस्थित होते. अद्यावत अश्या रुग्णवाहिका नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी उपल्ब्ध झाल्या आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना होईल. राज्य शासन माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या माध्या मातून सर्वेक्षण करत आहे. रुग्णांना उपचार लवकर मिळावा यासाठी जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका देण्याचा एक चांगला निर्णय घेतला.असे अजित पवार लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना म्हणाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाव्यात
यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून पायाभूत सुविधा या लेखाशिर्षाखाली प्रत्येकी २० लाख रुपयांप्रमाणे एकूण १८ कोटी निधी रुग्ण कल्याण समित्यांकडे वर्ग करण्यात आला होता.
यातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मागील चार महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. राज्याच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका घेण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या.
पुणे जिल्ह्यात एकूण ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी खेड तालुक्यातील दोन आणि भोर मधील दोन आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने हे चार आरोग्य केंद्र वगळून उर्वरित ९२ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक अॅंब्युलन्स चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून घेण्यात आल्या आहेत.सगळ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात असा मानस आहे. आज ५१ रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला असल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.
COMMENTS