दोन अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन बलात्कार करणा-याच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेत त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या वडगांव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑगस्ट २० रोजी आरोपी सतीश सुरेश मोरे वय २२ रा.साखरवाडी ता.फलटण याने करंजेपुल येथील समाजमंदिर येथून दोन अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मोटर सायकल वरून पळवून घेवून गेलेला होता. यातील मुलीस सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात व फलटण तालुक्यात लपवून ठेवले होते. यातील एका अल्पवयीन मुलीस २६ ऑगस्ट २० रोजी संध्याकाळी सोडून दिले तर दुसरे मुलीवर ४ सप्टेंबर २० पर्यत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरी संभोग केला. तो आरोपी आतापर्यंत फरारी होता. दि.२४ सप्टेंबर २० रोजी रात्री उशीराने आरोपी सतीश सुरेश मोरे हा साखरवाडी येथे आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांना मिळाल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच सहा.पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शनाखाली साखरवाडी येथील केळीच्या व ऊसाच्या शेतात पाठलाग करून पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंडे व कर्मचारी साळुंखे तसेस होमगार्ड आरोपीस पकडून बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टाने आरोपीची 3 दिवस पोलिस कोठडी दिली आहे
COMMENTS