सोमेश्वरनगर येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी : वाढती संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे विनंती
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता.बारामती येथे कोरोना’चा वाढता पादुर्भाव लक्षात घेता कोविड सेंटर होणे आवश्यक वाटत आहे. सोमेश्वरनगर परिसरात गावामध्ये कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. कोविड सेंटर होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वाघळवाडी ग्रामपंचातीचे सदस्य हेमंत गायकवाड यांनी केली आहे.
सोमेश्वर परिसरातील गावामध्ये कोरोना पेशंट सापडन्याची संख्या वाढत आहे. बारामती तालुक्यात दररोज पेशंट वाढत असल्याने बारामती येथील दवाखान्यावर पर्यायाने आरोग्य प्रशासनावर ताण वाढत आहे. बारामती येथेही त्तब्बल चार दिवसात चारशेचा आकडा ओलंडला आहे. यामुळे पुन्हा बारामती तालुक्यात लॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला आहे.
यामुळे सोमेश्वरनगर येथील २५ ते ३० गावांच्या सोयीकरिता पूर्वनियोजित कोविड सेंटर करण्यात यावे. अशी अजितदादा पवार यांना दिलेल्या पत्रात मागणी हेमंत गायकवाड यांनी केली आहे.
COMMENTS