सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे     -जिल्हा धिकारी डॉ.राजेश देशमुख   पुणे दि .03 : -    पुणे जिल्हयाम...

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे   -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

पुणे दि .03 : -   

पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी  करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.

            जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय  व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये  दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.

               जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे  आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच  चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

                 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग

रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1054,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
https://lh3.googleusercontent.com/-cHILPi-c2Lk/X1C54iZwmbI/AAAAAAAAC3E/yPRfNsdQBAsppV4lb2KNgyi23lzQ6ii7QCLcBGAsYHQ/s1600/1599125969081617-0.png
https://lh3.googleusercontent.com/-cHILPi-c2Lk/X1C54iZwmbI/AAAAAAAAC3E/yPRfNsdQBAsppV4lb2KNgyi23lzQ6ii7QCLcBGAsYHQ/s72-c/1599125969081617-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_3.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_3.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy