फायनान्सच्या जुलमी वसुलीतून सोडवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोरोना महामारीशी लढत असताना महाराष्ट्रातील माता भगिनींना मायक्रो फायनान्सच्या जुलमी वसुलीतून सोडवावे यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यात बुधवार(दि.२३) रोजी आंदोलन करण्यात आले. मायक्रो फायनान्सचे घेतलेले कर्ज माफ व्हावे व जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत वसुली थांबविण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना यावेळी आंदोलकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष संतोष भिसे , भाऊसो हुंबरे, दीपक दणाने , विकास शेंडगे, बंटी गायकवाड, सचिन पाटोळे, रेश्मा दणाने, विद्या भिसे , संगीता खोमणे, छाया सोनवणे, जयश्री साखरे, रेखा कांबळे, स्वाती गायकवाड उपस्थित होते.
COMMENTS