गोव्याला जाताय, आनंददायी प्रवासासाठी सातारा महामार्गाचाच वापर करा : गुगलचा पर्यटकांना सल्ला
भोर : प्रतिनिधी
सुरक्षित,अल्हाददायक प्रवास व लाँग ड्राईव्हचा मनमुराद आनंद घेण्यासाठी गोव्याला जाताना पुणे सातारा महामार्गाचाच वापर करावा असा सल्ला पर्यटन सल्लागार व गुगल मँपच्या वतीने पर्यटकांना देण्यात आला आहे.
जागतीक पातळीवरील सर्च इंजिन गुगलने पुणे सातारा महामार्गाची दखल घेवुन या मार्गाने प्रवास केल्यास एक चांगला अनुभव पर्यटकांना मिळु शकतो असे सांगुन महामार्ग प्राधिकरणाच्या कामाची प्रशंसा केली आहे या लेखात गुगल ने म्हंटले आहे कि,मुंबई व पुण्यात राहणारया लोकांचे सुट्टीचे आवडते ठिकाण म्हणजे निसर्गरम्य गोवा सुट्ट्या निमित्त किंवा विकऐंडला अनेकजण गोव्याला जाणे पसंत करतात या ठिकाणी जाताना जर पुणे सातारा मार्ग आवलंबला तर प्रवासाचे रोडट्रिप मध्ये रुपांतर होते येथील गुळगुळीत रस्ते व आरामशीर ड्रायव्हींग करताना गोवा पोहचे पर्यंत मित्र व कुटुंबासह हा एक उत्सवच असतो.
आज जास्ती जास्त वाहन चालक पुणे सातारा महामार्गाचा वापर करत आहेत अंतर थोडे लांब असलेतरी रस्त्याचा दर्जा चांगला असल्याने वेगात पोहचत आहेत,मागील दशकात या मार्गावर रस्ते विकासाची मोठी कामे झाली आहेत 4 ते 6 लेन हायवे अनेक ठिकाणी पारंपारीक गर्दी टाळण्यासाठी शहराला बायपासची व्यवस्था करण्यात आली आहे,जास्त वक्र व वळणे न ठेवता रस्ता सरळ ठेवला असुन,महिलांसाठी ट्रँफिक बाफ मुळे रात्रीच्या प्रवसासाठी सुरक्षित,योग्य रस्ता दुभाजक,लेनच्या खुणा,भोजनाला थांबण्यासाठी अनेक ठिकाणी दर्जेदार हाँटेल,वाटेत पन्हाळा किल्ला,ज्योतीबा मंदीर,रंकाळा तलाव या मुळे रस्ता खुपच संस्मरणीय व आरामदायी वाटतो महत्वाचे म्हणजे पश्चिम घाटातील अरुंद,उंच,सखल तसेच बँरीकेटेड नसलेल्या पनवेल गोवा मार्गा पेक्षा हा रस्ता फारच सुरक्षित व आनंददायक आहे असे गुगलने म्हंटले आहे.
पर्यटकां बरोबरच माल वाहतुक करणारे ट्रक चालक,अवजड वाहन चालक,आरामबस चालक या पुणे सातारा महामार्गाचा वापर करत आहेत हा मार्ग मोठा असलातरी वेगवान व सुरक्षित असल्याने या प्रवासास पनवेल मार्गा पेक्षा तीन तास कमी लागतात.
प्रवासी पर्यटक या रस्त्याच्या अनुभवा बाबत बोलताना सांगतात कि,अप्रतिम रस्ते व लांबलचक सरळ मार्ग, जंगल,डोंगर व सपाटी या तिन्हींचा अनुभव घेत या मार्गावर एक संस्मरणीय प्रवास वेगाने होतो याचे आम्हा समाधान वाटते.
असे महामार्गाचे वर्णन करुन गुगलने गोवा सहलीचा विचार करत असाल तर मुंबई-पुणे-सातारा-गोवा महामार्ग वापरुन पहा व लाँग ड्राईव्हचा आऩंद घ्या असा सल्ला दिला आहे. या महामार्गाचे काम करणारे रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक अमित भाटीया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले कि, गुगलऩे महामार्ग प्रधिकरणाच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आनंद होत आहे. खरोखरच हा मार्ग आनंददायक आहे फक्त पुणे नंतर शिंदेवाडी ते सारोळा या फक्त वीस किलोमिटर पर्यतं अद्याप काही ठिकाणी अपूर्ण काम चालु असल्याने थोडा अडथळा होत आहे, परंतु तो देखिल लवकरच पुर्ण होत असुन अखंड अडथळा रहीत रस्त्याचा आनंद घेता येणार आहे.
COMMENTS