"सोमेश्वर" च्या सभासद, कामगारांना दिवाळीची साखर मिळणार दीड महिना आधी : प्रतिकार्ड किती मिळणार साखर, वाचा सविस्तर

Admin
"सोमेश्वर" च्या सभासद, कामगारांना दिवाळीची साखर मिळणार दीड महिना आधी : प्रतिकार्ड किती मिळणार साखर वाचा सविस्तर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कोविड च्या प्रादुर्भावामुळे सोमेश्वर कारखाण्यामार्फत दिवाळी साठी दिली जाणारी साखर या वर्षी दीड महिना आधीपासून वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 
       याबाबत कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हनटले आहे की,  कारखान्याचे सर्व सभासद बंधू-भगिनी व कामगार यांना कळविणेत येते की, सध्या
देशात व राज्यात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता व तसेच माहे नोव्हेंबर मध्ये "दिपावलीचा" सण येत असल्याने दिपावलीची साखर नेहणेकरीता गर्दी होऊ नये याकरीता कारखाना व्यवस्थापनाने सवलतीच्या दराने सभासदांना दिपावलीच्या सणाकरीता वाटप
करणेत येणारी साखर ही दि.०१/१०/२०२० पासून खालील तपशिलाप्रमाणे वाटप करणेचा
निर्णय घेणेत आलेला आहे.
          यामध्ये सभासदांना प्रतिकार्ड ३० (तीस) किलो तर  कामगारांना प्रतीकार्ड १० (दहा) किलो १५ रुपये दराने मिळणार आहे. सभासदांनी ही साखर  ३० नोव्हेबर अखेर दिपावलीची साखर घेवून जाणेची खबरदारी घ्यावी.  अन्यथा मुदतीत साखर नेहणेची राहिल्यास ती कोणत्याही परिस्थितीत मुदतीनंतर दिली
जाणार नाही याची नोंद घ्यावी व आपली हक्काची साखर कारखान्याने घालून दिलेल्या
मुदतीत घेवून जावून कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे असे परिपत्रकात म्हटले आहे. 

राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक
सध्या राज्यात कोरोनाचे संकट असल्याने दिवाळी साखर खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून साखर वाटप १ ऑक्टोबर पासून दीड महिना आधी वाटप करण्यात येणार आहे. साखर खरेदीसाठी सभासद व कामगार यांनी गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग चा वापर करून साखर खरेदी करावी
To Top