उद्यापासून सुरू होणाऱ्या बारामतीत काय राहणार बंद : वाचा सविस्तर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
१४ दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व व्यवहार उद्या सोमवार दि २१ पासून सुरु होणार आहेत. मात्र रेस्टॉरंट, पानटपरी, जिम, थिएटर, शाळा, प्रायव्हेट क्लासेस आणि स्विमिंगटँक हे बंद राहणार आहे.
उर्वरित सर्व सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत बाजारपेठ सुरु ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे १४ दिवसांपासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता बारवकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह व्यापारी महासंघाचे नरेंद्र गुजराथी, सुशिल सोमाणी, निखिल मुथा, प्रविण अहुजा आदी या बैठकीला उपस्थित होते.
बारामतीत ७ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा या उद्देशाने हा कर्फ्यु लागू करण्यात आला होता. आज या कर्फ्युच्या शेवटच्या दिवशी प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
COMMENTS