उंडवडी सुपेत ढगफुटी : घरात दुकानात पाणीच पाणी
उंडवडी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जिरायती भाग समजणारा उंडवडी सुपे या भागात रवीवार दि ६ रोजी सायंकाळी ८ वाजता ढगफुटी झाल्याने येथील दुकानात तसेच घरात पाणी शिरल्याने नागरीकांची तारंबळ उडाली पाऊस थांबता थांबेना रस्त्यालाही ओढ्याचे स्वरुप झाले जिकडे पाहवे तिकडे पाणीच पाणी कायम दुष्काळाचा सामणा करणारी येथील जनता, दरवर्षी डिसेंबर महिना संपला की पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर वर अवलंबून परंतु दोन हजार वीस सालात पाऊस भरपुर पण शेतात उत्पन्न झीरो त्यात कोरोना रोगाचे वाढता प्रादुर्भाव यात कशीबशी येथील जनता सावरतेना सावरते तोच रवीवार हा दिवस घातकच ठरला ऐरवी पाणी पाणी करणारी जनता परंतु ढगफुटी झाल्याने हैराण झाली दोन तास पाऊस झाला तरी थांबायचे नावच घेईना, घरात पाणी दुकानात पाणी त्यात लाईट नाही जिव मुठीत धरुन येथील जनता पाऊस थांबायची वाट पाहत आहे. परंतु कोरोनाने हैरान झालेली जनता या ढगफुटी ने उपझारी येईल का? हाच मोठा प्रश्न आहे .
COMMENTS