करंजेपुल पाच, निंबुत येथील एकासह ग्रामीण बारामतीत ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
करंजेपुल पाच, निंबुत येथील एकासह ग्रामीण बारामतीत ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

गेल्या ७ तारखेपासून बारामतीत जनता कर्फ्यु असून तो आता २० तारखेपर्यंत असणार आहे. ज्यावेळी जनता कर्फ्यु सुरू झाला तेंव्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. मात्र आता जनता कर्फ्यु चा फायदा समोर येऊ लागला आहे. आज तालुक्यात फक्त ५८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ग्रामीण भागातील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

दि १३ चे एकूण rt-pcr नमुने २३५
एकूण पॉझिटिव्ह- २७ 
प्रतीक्षेत ७ 
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.         
कालचे एकूण एंटीजन ७९         
 एकूण पॉझिटिव्ह-३१                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५८
 शहर- २३ ग्रामीण- ३५             
 एकूण रूग्णसंख्या-२११३                
एकूण बरे झालेले रुग्ण- १०१३            
एकूण मृत्यू-- ५६
To Top