सहाजण एकत्र : वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Admin
सहाजण एकत्र : वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी एकत्र जमल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
          सुपे ता बारामती येथे काल सायंकाळी सहाजन एकत्र जमल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी प्रसाद तुकाराम भंडलकर वय 25 वर्षे रा.नारोळी ता.बरामती,  संजय महादेव लोणकर वय 50 वर्षे रा.सुपा  ता.बरामती, संजय रमणलाल परदेशी वर्षे 34 रा.सुपा  ता.बरामती, सचिन संजय लोणकर, प्रदीप पोपट जगताप, शिवाजी भिमराव जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
        आरोपी यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचे वरील आदेशाचे उल्लंघन करुन एकत्रीत बसलेले मिळुन आले होते म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
To Top