परिंचेत आशा सेविकांना आरोग्य कीटचे वाटप
परिंचे : प्रतिनिधी
वीर-भिवडी जिल्हा परिषद गणातील ४० आशा सेविकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व आरोग्य कीटचे वाटप करून सन्मानीत करण्यात आले.यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी उपसभापती निलेश जगताप, वैशाली धसाडे मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असताना गेल्या सहा महिन्यांपासून आशा सेविका गाव पातळीवर आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करत आहेत.घरभेटी देऊन आरोग्य तपासणी, स्तलांतरीत लोकांच्या नोंदी ठेवणे तसेच कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांची चौदा दिवस आरोग्य तपासणी करत असून अनेक आशा सेविकांना कोरोनाची लागण झाली होती. आशा सेविकांना समाजात काम करताना आरोग्य संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा महिला मोर्चा संगठन सरचिटणीस ऋतुजा जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य कीटचे वाटप करण्यात आले. यामध्ये वाफेचे मशिन,मास्क, सॅनिटाझर, हॅन्डग्लोज तसे फळांचा समावेश करण्यात आला होता.
कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायत शिपाई व अंगणवाडी सेविकांना कीट वाटण्यात आले.गाव पातळीवर कोरोना रोगाचा सामना करताना आशा सेविकांना गेल्या सहा महिन्यांत आलेले अनुभव सांगून आमच्या कामाची पहिल्यांदाच दखल घेतली असल्याचे नमूद केले. यावेळी पुरंदर तालुका सरचिटणीस श्रिकांत थिटे, युवा मोर्चा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप कटके, पुरंदर तालुका उपाध्यक्ष मधुकर धसाडे, पुरंदर तालुका सरचिटणीस संदीप नवले, माजी उपसरपंच ऋषिकेश धसाडे, हनुमंत सोळंकी, उल्हास जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोहित जाधव यांनी मानले.
COMMENTS