सोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सोमेश्वर कारखाना आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वरनगर येथे कोविड केयर सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुरूम ता बारामती येथे पदाधिकारी, प्रशासन, सर्व गावाचे सरपंच आणि आरोग्य सेवक यांच्यात पार पडलेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यावेळी
प्रांताधिकारी दादासो कांबळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, सपोनि सोमनाथ लांडे, राजवर्धन शिंदे, सभापती नीता बारावकर, उपसभापती प्रदीप धापटे, सदस्या नीता फरांदे, विक्रम भोसले, सोमेश्वर चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सतीश सकुंडे, कौस्तुभ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम भागात
रुग्न वाढत असल्याने बेड मिळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे काकडे यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायत, आरोग्य रुग्णालय यांनी एक खिडकी योजना देवून नागरिकांना माहिती द्यावी. या सेंटर साठी आरोग्य सर्व स्टाफ देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले. पंचायत समिती गटात ५० वर्षं वयोगटातील नागरिकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचे साहित्य आणि गोळ्या देत आहोत. स्थानिक डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना कोविड सेंटर साठी मदत करण्याची गरज व्यक्त केली. याठिकाणी कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतील. ट्रिपल सी कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. असल्याचे काकडे यांनी सांगितले
COMMENTS