रविवार पासून महाराष्ट्रात लालपरी धावणार पूर्ण आसन क्षमतेने : विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
लॉकडाउन मुळे गेली अनेक महिने बंद असलेली लालपरी आता रविवार पासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आसल्याची माहिती पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.
गायकवाड पुढे म्हणाले की, सद्या अनेक तालुक्यात लॉकडाउन आहे, जसेजसे लॉकडाउन उठेल तसे प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस चालू करण्यात येणार आहेत. पूर्वी २२ ते २५ ची मर्यादा असणाऱ्या बसेस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहेत.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दि.२०.०८.२०२० पासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५०% प्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास रा.प. महामंडळास परवानगी दिली होती. त्यानुसार रा.प. विभागांकडून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून कर्नाटक व गुजरात राज्यात १००% प्रवासी वाहतूकीच्या सुरु केल्याच्या धर्तीवर रा.प. महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
एसटी महामंडळ आणि प्रवाशांसाठी नियम--------
बसेसमधून प्रवास करण्या-या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईजर लावणे बंधनकारक असणार आहे.
• वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात येणार आहेत,
• लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापि, पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्ववतप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत.
सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करुन पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले, त्यानुसार
नियत व फे-यांचे सुसुत्रीकरण करण्यात येणार आहे.
COMMENTS