जागेची उपलब्धता होताच लवकरच 'सोमेश्वर'ला १०० बेडचे कोविड सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर या ठिकाणी कोविड सेंटर होण्याबाबाबत नुकतीच मुरूम या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीत कोविड सेंटर ला मंजुरी मिळाली असून जागेची उपलब्धता होताच लवकरच काम सुरू करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
याबाबत सोमेश्वर रिपोर्टर चे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना आरोग्य सभापती प्रमोद काकडे म्हणाले की, सोमेश्वरनगर या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे असे अनेक नागरिकांनी मागणी होती, याबाबत नुकतीच मुरूम या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीत या बाबत हिरवा कंदील मिळाला आहे. यादृष्टीने प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोमेश्वर कारखाना यांचे कडून जागेची अजून पाहणी सुरू आहे. जागा उपलब्ध होताच चारच दिवसात सोमेश्वरनगर याठिकाणी कोविड सेंटर उभे राहणार आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. सुरुवातीला आपण १०० बेडचे ट्रिपलसी कोविड सेंटर उभारत असून यासाठी सांगणाऱ्या सर्व स्टाफ ची उबलब्धता झाली असून यामध्ये सहा डॉक्टर आणि २० इतर स्टाफ आहे. सोमेश्वरनगर या ठिकणी जागेबाबत अंतिम निर्णय झाला असून जागा उपलब्ध होताच लागलीच ट्रिपल सी कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी चाचणी ची सोय केली जाणार असून ऑक्सिजन बेडची देखील सोय केली जाणार आहे.
COMMENTS