सोमेश्वर कारखान्याच्या पाणी साठवण तलावात १६ वर्षीय मुलीचा मृतदेह : आत्महत्या की अपघात ?
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर कारखान्याच्या पाणी साठवण तलावात एका १६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र ही आत्महत्या की अपघात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सोनू मंगल पवार रा. सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालयात, वाघळवाडी, मूळ रा. फुलउमरी, वाशीम यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी म्हनटले आहे की,
मी वरील ठिकाणी माझे आई वडील, बहीणी १) पुजा वय १६ वर्षे, व २) उमा असे एकत्र राहात असुन मोल मजुरी करून करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. आम्ही राजु हिरासिंग जाधव यांच्याकडे बिगारी म्हणून कामाला आहे. त्यांचे सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वाघळवाडी येथील इंजिअरींग कॉलेजचे बिल्डींगचे काम चालू असून तेथे आम्ही मजुरीने काम करतो व तेथेच राहतो. दि ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मी तसेच माझे आई वडील असे सोमेश्वर
सहकारी साखर कारखान्याचे वापळवाडी येथिल इंजिनिअरिंग कॉलेजचे बिल्डींगचे कामासाठी मजुरी कामाला आलो होतो. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आम्ही तिघे घरी जेवण करण्यासाठी गेलो. जेवन झाले नंतर परत आम्ही तिघे दुपारी २ च्या सुमारास कामावर आलो. त्यावेळी घरी माझ्या दोन्ही बहीणी पुजा वय १६ वर्षे, व उमा या होत्या.
आम्ही कामावर असताना दुपारी ३ च्या सुमारास माझी लहान बहीण उमा ही आमच्याकडे आली व तीने सांगितले की दिदी २.३० वाजण्याच्या सुमारास बाटली घेवून बाथरूमला गेली होती ती अजुन घरी आली नाही असे सांगितले. त्यानंतर आम्ही तीघे घरी गेलो. त्यानंतर आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी तसेच आम्ही राहत असलेल्या ठिकाणचे आजुबाजूचा परीसरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने आमचे पाहूण्याना फोन करून बहीण पुजा हिचे बाबत चौकशी केली. परंतु काहीएक माहीती मिळून आली नाही.काल दि १ रोजी आम्ही बहीण पुजा हिचा ती बाथरूमला गेलेल्या बाजुला शोध घेत असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पाणी साठवण्याचे तलावातील पाण्यात बहीण पुजा हिच्या चप्पला तरंगताना दिसल्या. म्हणून आम्ही आमच्या सोबत असणारे इतर कामगारांच्या मदतीने तळयातील पाण्यात पुजा शोध घतला असता ती मिळून आली. त्यानंतर तीचे प्रेत पाण्याचे बाहेर काढले. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र फणसे करत आहेत.
COMMENTS