दोन दुचाकीच्या धडकेत एक जण ठार : वाघळवाडी येथे अपघात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा बारामती रस्त्यावर वाघळवाडी येथे दोन दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
काल दि १ रोजी रात्री आठ वाजता वाघळवाडी- अक्षय गार्डन याठिकाणी हा अपघात झाला. या अपघातामध्ये धनाजी उर्फ अमोल गणपत सावंत यांचे दुःखद निधन झाले. अक्षय गार्डन नजिक दोन दुचाकी मध्ये हा अपघात झाला. यामध्ये इतर तिघांना दुखापत झाली आहे. धनाजी सावंत यांना बारामती येथे उपचारा साठी दवाखान्यात नेहण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्याची त्यांचा मृत्यू झाला.
COMMENTS